अंगार कादंबरीचा प्रकाशन सोहळा पुण्यात संपन्न

0
adddd

पुणे, दि. २६ डिसेंबर — अंगारी कादंबरीचा प्रकाशन सोहळा पुणे येथील इंटरनॅशनल कन्व्हेशन सेंटर, सेनापती बापट रोड येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात आला.

लायन्स क्लब अग्रेसन पुणे, राज्यस्तरीय शिक्षण संजीवनी मासिक, युवा महाराष्ट्र फाउंडेशन व अनुर्वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे आयोजन अविनाश सकुंडे आणि देविदास लिमजे संपादक शिक्षण संजीवनी मासिक यांच्या प्रेरणेने करण्यात आले. आयुष सकुंडे ( व्हा. चेअरमन सेंट्रल एज्यु डेवलपमेंट पार्लमेन्ट कमिटी व त्यांचे सहकारी यांनी हे नियोजन अमलात आणले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून महेश थोरवे (संचालक, एमआयटी विद्यापीठ), रवी अगरवाल (संस्थापक, अनुर्वी फाउंडेशन), सावंत साहेब (कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन), डॉ. संजय जगताप (कार्यकारी संपादक, शिक्षण संजीवनी मासिक) आणि सुनील पवार (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत गायन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अंगार कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. लेखक – अविनाश सरोदेराजयोग प्रकाशनचे संचालक देविदास लिमजे हे उपस्थित होते.

यावेळी डॉ. संजय जगताप यांनी मनोगत व्यक्त करत लेखक अविनाश सरोदे याचे कौतुक केले. ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड विजेते नरेंद्र अंबाला यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून नीतिमान व मूल्याधिष्ठित जीवनाचा संदेश दिला. कृषी अधिकारी सावंत साहेब, सुनील पवार, रवी अगरवाल व महेश थोरवे यांनीही आपले विचार व्यक्त करून लेखकाचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी सर्व अविनाशचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री गणेश मोढवे यांनी केले. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!