नाट्यरंगमंचावरून मतदानाचा जागर, पिंपरी चिंचवडमध्ये लोकशाहीचा जागर करण्यासाठी राबवण्यात आला उपक्रम

पिंपरी, दि. ३० डिसेंबर २०२५ : कलाकारांच्या शब्दांतून आणि रसिकांच्या सहभागातून मतदानाचे महत्त्व अधोरेखित करीत, लोकशाहीचा मूलमंत्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे मतदान जनजागृती उपक्रम पार पडला. कला, संस्कृती आणि लोकशाही यांचा सुरेल संगम साधत, रंगमंचाच्या माध्यमातून दिलेला मतदानाचा संदेश नागरिकांच्या मनात रुजवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांनी देखील सहभागी होत आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले.पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट…’ या नाट्यप्रयोगाच्या वेळी मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमाच्या निमित्ताने रंगमंचावर केवळ मनोरंजनच नव्हे, तर लोकशाहीची जबाबदारीही अधोरेखित करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये शेकडो नाट्यरसिकांनी मतदानाची शपथ घेत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प व्यक्त केला. नाट्यप्रयोगासारख्या लोकप्रिय माध्यमातून मतदानाचा संदेश पोहोचविल्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद निर्माण झाला असून, येणाऱ्या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

मतदानाची शपथ”आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.….

पिंपरी चिंचवड महा1पालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा. सर्वात प्रथम मतदान करा, कारण लोकशाही सशक्त करण्यासाठी ते अत्यंत गरजेचे आहे.– कविता लाड मेढेकर, अभिनेत्री…*कोट*येत्या १५ जानेवारीला पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे. या दिवशी देण्यात आलेल्या सुट्टीचा उपयोग मतदानासाठीच करा. मतदान हा आपला लोकशाहीतील मूलभूत हक्क आहे. त्यामुळे १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नक्की मतदान करा.– प्रशांत दामले, अभिनेते…*कोट*लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान हा केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कला व संस्कृतीच्या माध्यमातून दिलेला मतदानाचा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचतो आणि त्यातून लोकसहभाग वाढतो, ही बाब अत्यंत सकारात्मक आहे.– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

  1. ↩︎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Author

digitalsubhash07@gmail.com

महाराष्ट्र

संजय जगताप यांच्या ‘सांकव’ पुस्तकाचे अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशन

Post Views: 192 मराठी प्रवासवर्णन साहित्याला नवे परिमाण देणारे संजय वसंत जगताप यांचे बहुप्रतीक्षित ७ वे पुस्तक ‘सांकव’ चे प्रकाशन ९९ वे...

Read out all

काळेवाडी प्रभागातून मोनिका नढे यांच्या प्रचार रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Post Views: 11 काळेवाडी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ (नढे नगर विजयनगर) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार...

Read out all

चौकार विजयाचा… दत्ताभाऊ धनकवडे

Post Views: 15 पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ३८ ब बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज मधून दत्ताभाऊ धनकवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पुण्यनगरीचे...

Read out all

अंगार कादंबरीचा प्रकाशन सोहळा पुण्यात संपन्न

Post Views: 60 पुणे, दि. २६ डिसेंबर — अंगारी कादंबरीचा प्रकाशन सोहळा पुणे येथील इंटरनॅशनल कन्व्हेशन सेंटर, सेनापती बापट रोड येथे मोठ्या...

Read out all

‘महाराष्ट्र गौरव सन्मान व महाराष्ट्र उद्योजक सन्मान–२०२५’चा भव्य सोहळा पुण्यात संपन्न

Post Views: 389 विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, प्रेरणादायी मनोगतांनी कार्यक्रमाला रंगतपुणे, दि. २६ डिसेंबर — महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक तसेच प्रशासकीय...

Read out all

प्राण प्रतिष्ठा : समारोह को लेकर तैयारियां जोरों पर, स्वच्छता अभियान में पसीना बहा रहे कर्मचारी

Post Views: 48 शेरगढ़। अयोध्या नगरी में होने वाले प्राण प्रतिष्ठा समारोह की तिथि जैसे जैसे नजदीक आती जा रही है लोगों...

Read out all
error: Content is protected !!