तुम्ही एक संधी द्या, गावातील विकास कामे आम्ही करू – उमेदवार शोभा बरचे

0
oplus_0

oplus_0

बोरी, मुशिराबाद गावातील नागरिकांचा प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भातांगळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सुनील पडिले व बोरी पंचायत समिती गणाचे उमेदवार शोभा चंद्रकांत बरचे यांच्या प्रचार रॅलीला बोरी, मुशिराबाद या गावातील सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.यावेळी गावातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना, महिलानी त्यांचे औक्षण करून त्यांना विजयी भव: असा आशीर्वाद देऊ त्यांचे स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांच्या मूलभूत गरजा आणि गावातील उद्भवत असलेल्या समस्या मांडल्या, आणि यावेळी बदल घडवून येणार निर्धार नागरिकांनी केला असल्याची माहिती व्यक्त केली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व करण्यासाठी शोभा चंद्रकांत बरचे यांना लाडक्या बहिणींचा व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.काँग्रेस पक्षाने केलेली अनेक विकासकामे, शेतकऱ्याचा विकास, शिक्षण संस्था, आरोग्य सुविधा, तरुणासाठी नोकरी, महिलांसाठी व्यवसाय अशा विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याच माध्यमातून गावातील चांगले रस्ते, पाणी, विद्युत पथदिवे, बचत गटांना आर्थिक मदत यासारख्या अनेक सुविधा गावामध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. याच विकासकामाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात सर्व गावातील व परिसरातील विकासकामे मोठ्या प्रमाणात करणार असल्याचे शोभा बरचे यांनी नागरिकांना सांगितले.

oplus_0

या प्रचार रॅलीला विलास पाटिल, जीवन मलवाडे, भरत पाटील, बालाजी मनदुमले, गोविंद पाटील,बाबूराव मलवाडे, अनुरथ गव्हाणे, बाबू ढेकणे, शिवाजी बाजुळगे, मोहन सपाटे, राम गायकवाड, सुग्रीव नाईकवाडे, हनुमंत शिंदे, सिद्धेश्वर स्वामी, भीमा ढेकणे, दगडू कांबळे, अजित बरचे, शोभा गव्हाणे, सुरेखा बरचे, चित्रकला दाताळ, शालू गव्हाणे आणि अनेक नागरिक व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रचार रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!