लिटिल स्टार पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न
सोलापूर : शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी श्री अमोगसिद्ध सेवा मंडळ संचलित,लिटिल स्टार पब्लिक स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहाने करण्यात आले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस हवालदार चेतन गवंडी, भीमसेन देशमुख, लाभले होते. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब काळे सर, सहसचिव श्री प्रमोद व्हनकोरे सर, लिटिल स्टार पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा कोरे मॅडम, श्री सद्गुरु धुळेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम श्रीमती पाटील मॅडम हे देखील उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोगाचे आयोजन केले होते. उदा-सोलर सिस्टिम, ट्राफिक रुल्स, टाइप्स ऑफ हाऊस, सेन्स ऑर्गन्स, हेल्दी फूड, अनहेल्दी फूड इत्यादी. या प्रदर्शनाच्या वेळी श्रीमती श्रद्धा कोरे मॅडम यांनी मुलांना विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी गण उपस्थित होते.
