दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी संदीप टेळे, तर उपसभापतीपदी वर्षा पटणे यांची बिनविरोध निवड.

0
IMG-20260312-WA0269


सोलापूर : (महेश पवार सोलापूर )
दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया गुरुवारी पार पडली. यामध्ये सभापतीपदी संदीप टेळे तर उपसभापतीपदी वर्षा पटणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दोन्ही प्रमुख पदांवर बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
या निवड प्रक्रियेवेळी पंचायत समितीचे सदस्य मळसिद्ध मुगळे, विजय राठोड, शिल्पा बिराजदार, अंबिका पाटील, सुरज पाटील, बलवान गोतसुर्वे, पंचप्पा धनशेट्टी, अंबिका दुपारगुडे आणि प्रियांका रमेश आसबे उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्या प्रियांका कुबसंगे यांनीही या निवडीला आपली उपस्थिती दर्शवली.
या निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, नेताजी खंडागळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मनीष देशमुख, अतुल गायकवाड, महेश बिराजदार आणि महादेव पाटील सिद्धाराम हेले, हनुमंत कुलकर्णी, यतीन शहा , नितीन रणखांबे, मनोज गुंड मधुकर चिवरे श्रीमंत हाक्के लक्ष्मण गडदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बिनविरोध निवडीमुळे तालुक्याच्या राजकारणात एकोपा दिसून आला असून, आगामी काळात तालुक्याच्या विकासकामांना गती देणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!