सलगरा बु.गावातील भाजपाच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
oplus_1024

oplus_1024

गावातील सर्व विकासकामे केली आणि करत राहणार – महादेव साळुंके

सलगरा बु :  जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराला सगळीकडे सुरुवात झालेली आहे. त्याच दरम्यान भातांगळी जिल्हा परिषद गट व बोरी पंचायत समिती गणातील सलगरा बु. येथे प्रचार नारळ फोडून भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी भातांगळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार महादेव साळुंके व बोरी पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ. सिंधुताई खुरदळे यांच्या हस्ते गावातील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. प्रचार रॅलीच्या माध्यमातून गावातील सर्व गल्लीबोळामध्ये जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करून विजयी करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी गावातील माता – भगिनीनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. गावातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना काही नागरिकांनी त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली. व त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडवणारा आपल्या हक्काचा माणूस याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहोत म्हणत, त्यांनी दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिला.

यावेळी महादेव साळुंके म्हणाले की, सलगरा बु. हे गाव माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी हेच आहे. या गावच्या विकासासाठी मी अनेक विकास कामे केले आहेत आणि कामे करत राहणार, आजच्या रॅलीला गावातील नागरिकांचा मिळालेला पाठिंबा हाच माझा विजय आहे, आत्तापर्यंत मी गावची सेवा केली आत्ता संपूर्ण भातांगळी गटाची सेवा करण्याची संधी गावातील नागरिक देणार असा विश्वास आहे, गेले अनेक वर्ष गावांमधील राजकारण करत असताना अनेक विकासात्मक वाटचालीकडे कार्य करणे आणि गावचा विकास करणे हाच माझा ध्यास आहे. तो मी केलेला आहे गावातील रस्ते ,आरोग्य विषयक समस्या, पाणी, शिक्षण, सभागृह, स्मार्ट शाळा,सिमेंट रस्ते, सुशोभीकरण, कचरा व्यवस्थापन यासारख्या अनेक प्रकारचे विकसित कार्य केले आहेत. गावातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या सर्व समस्या मार्गी लावले असल्याचे प्रतिपादन उमेदवार महादेव साळुंके यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या या प्रचार रॅलीच्या माध्यमातून सर्व गावातील परिसरामध्ये प्रचार करून संपूर्ण गाव भाजपमय झाल्याचे वातावरण दिसून आले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये गावातील सर्व नागरिक गावच्या सुपुत्राला आणि लाडक्या लेकीला मतरुपी आशीर्वाद देणार असल्याचे आजच्या या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून हे दोन्ही विजय होणार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!