काळेवाडी प्रभागातून मोनिका नढे यांच्या प्रचार रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Oplus_131072

Oplus_131072

काळेवाडी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ (नढे नगर विजयनगर) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार मोनिका नवनाथ नढे यांच्या प्रचार रॅलीला प्रभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.प्रभागातील केलेल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण प्रभागात ओळख निर्माण झाली असून सर्वसामान्यसाठी जनतेचे प्रश्न, अडीअडचणी, समस्या त्यांनी मार्गी लावले आहेत. प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्रचार करते वेळी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले व त्यांना निवडणुकीच्या विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रभागामधील पाण्याचे प्रश्न, चांगले रस्ते, महिलांची सुरक्षा, सुलभ शौचालय,ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणासाठी नोकरी, महिलांसाठी व्यवसाय असे अनेक विकासकामे प्रभागात करणार असल्याचे नढे यांनी सांगितले.यावेळी प्रभागातील नागरिकांशी प्रचार दरम्यान संवाद साधताना नागरिकांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवणारा, प्रभागाचा विकास करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार तसेच या निवडणुकीमध्ये नवीन चेहरा निवडणार असल्याचे सांगितले. प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांचा मिळत असलेला पाठिंबा हा त्यांच्या सामाजिक कार्याचे ओळख करून देत आहे. त्यामुळे मोनिका नढे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी देऊन त्यांना प्रभागाचा विकास करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण परिसरात प्रचार रॅलीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोनिका नवनाथ नढे यांना नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून यावेळी त्यांना मतदानाच्या माध्यमातून प्रभागाचे नेतृत्व करण्याची संधी मतदार देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!