विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, प्रेरणादायी मनोगतांनी कार्यक्रमाला रंगतपुणे, दि. २६ डिसेंबर — महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक तसेच प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या मान्यवरांना प्रदान करण्यात येणारा ‘महाराष्ट्र गौरव सन्मान–२०२५’ आणि ‘महाराष्ट्र उद्योजक सन्मान- २०२५’ हा मानाचा पुरस्कार आज पुणे येथील इंटरनॅशनल कन्व्हेशन सेंटर, सेनापती बापट रोड येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात प्रदान करण्यात आला.
लायन्स क्लब अग्रेसन पुणे, राज्यस्तरीय शिक्षण संजीवनी मासिक, युवा महाराष्ट्र फाउंडेशन व अनुर्वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन अविनाश सकुंडे आणि देविदास लिमजे संपादक शिक्षण संजीवनी मासिक यांच्या प्रेरणेने करण्यात आले. आयुष सकुंडे ( व्हा. चेअरमन सेंट्रल एज्यु डेवलपमेंट पार्लमेन्ट कमिटी व त्यांचे सहकारी यांनी हे नियोजन अमलात आणले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून महेश थोरवे (संचालक, एमआयटी विद्यापीठ), रवी अगरवाल (संस्थापक, अनुर्वी फाउंडेशन), सावंत साहेब (कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन), डॉ. संजय जगताप (कार्यकारी संपादक, शिक्षण संजीवनी मासिक) आणि सुनील पवार (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत गायन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील खालिल कर्तृत्ववान व्यक्तीना
‘महाराष्ट्र गौरव सन्मान–२०२५’ प्रदान करण्यात आला —
डॉ. सतीश सातपुते (प्रशासन – महाराष्ट्र शासन राज्य आदर्श शिक्षक विजेते),
डॉ. संदीप भाजी भाकरे (पोलीस उपायुक्त, पुणे शहर),
डॉ. सुनिता काटम (लेखिका, कवयित्री, पीएम श्री योजना विषय सहाय्यक),
विलास पाटील (सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सर्व शिक्षा अभियान, पिंपरी-चिंचवड मनपा),
विराज अडसुळे (संचालक, मावळ वार्ता टीव्ही चॅनल),
काजल शिंदे (दिग्दर्शक, अभिनेत्री व निर्माती),
रणजीत पवार (साहित्यिक, लेखक व संपादक),
उज्ज्वला जगताप (राज्य शाळा व्यवस्थापन पुस्तक निर्मिती समिती सदस्य),
दत्तात्रय गाडेकर (सीएसआर अधिकारी, स्माल्झ इंडिया – जर्मन कंपनी),
जयेश भांगडिया (डायरेक्टर, माय सॅक्रिड ट्रिप संस्था),
अनिल विधाते (राष्ट्रीय प्रशिक्षण प्रतिनिधी, अहिल्यानगर),
महेश साळुंके (उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, पिंपरी-चिंचवड),
श्री ज्ञानदेव गाडेकर (उद्योजक व डायरेक्टर, अमोल मोटर्स, पिंपरी-चिंचवड),
श्री कैलासचंद्र पाटील (प्रयोगशील कृषी संशोधक).
यासोबतच इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स टाइम्स अवॉर्ड विजेते श्री बापूसाहेब भोसले, शिवप्रसाद पिल्ले, नरेंद्र वाणी व नितीन वाघमारे यांचा गौरव करण्यात आला.
लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेते सचिन दादासाहेब थोरात,
राष्ट्रीय शिक्षक साहित्यरत्न पुरस्कार विजेते डॉ. मधुचंद्र भुसारे,
राष्ट्रीय सांस्कृतिक शिक्षक रत्न पुरस्कार विजेते डॉ. हरेश चौधरी,
ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड विजेते नरेंद्र अंबाला, तसेच
ग्लोबल आयकॉन अवॉर्ड विजेते साई विवेक लक्ष्मी गिरी यांनाही विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील नामवंत व कर्तुत्ववान उद्योजकांना महाराष्ट्र उद्योजक सन्मान पुरस्कार 2025 देऊन त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी डॉ. संजय जगताप यांनी मनोगत व्यक्त करत समाजाच्या सर्व थरांतील कर्तृत्ववान व्यक्तींची योग्य पारख करून त्यांचा गौरव केल्याबद्दल आयोजक संस्थांचे कौतुक केले. ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड विजेते नरेंद्र अंबाला यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून नीतिमान व मूल्याधिष्ठित जीवनाचा संदेश दिला. कृषी अधिकारी सावंत साहेब, सुनील पवार, रवी अगरवाल व महेश थोरवे यांनीही आपले विचार व्यक्त करून पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी सर्व सन्मानार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “अशा पुरस्कारांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री गणेश मोढवे यांनी केले. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना एकाच मंचावर सन्मानित करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
