प्रभाग क्रमांक २२ मधील सर्व विकासकामे करणार – मोनिका नढे

0
1003039784

काळेवाडी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ (नढे नगर विजयनगर) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार मोनिका नढे, उषामाई काळे, संतोष कोकणे, मच्छिंद्र तापकीर यांच्या प्रचार रॅलीला प्रभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मोनिका नवनाथ नढे यांच्या वतीने प्रभागातील केलेल्या कार्याच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण प्रभागात ओळख आहे .नवनाथ नढे यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रभागातील गेली अनेक वर्षे जनसेवेसाठी कार्य करत आहेत. त्यांनी प्रभागातील जनतेचे अनेक प्रश्न, अडीअडचणी, समस्या मार्गी लावले आहेत.त्यांचा प्रभागामध्ये मोठा जनसंपर्क असल्याने याचा मोठा फायदा निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी मोनिका नवनाथ नढे यांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार मोनिका नढे प्रचार करत असताना प्रभागातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करून महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले व त्यांना निवडणुकीच्या विजयासाठी आशीर्वाद दिला.

यावेळी प्रभागामधील पाण्याचे प्रश्न, चांगले रस्ते, महिलांची सुरक्षा, सुलभ शौचालय,ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणासाठी नोकरी, महिलांसाठी व्यवसाय असे अनेक विकासकामे प्रभागात करणार असल्याचे नढे यांनी सांगितले.

यावेळी प्रभागातील नागरिकांशी प्रचार दरम्यान संवाद साधताना  प्रभागातील अनेक समस्या, महिलांची सुरक्षा, प्रभागात न झालेला विकास, आरोग्य, शिक्षण, यासारख्या अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवणारा, प्रभागाचा विकास करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार तसेच या निवडणुकीमध्ये नवीन चेहरा निवडणार असल्याचे सांगितले.

प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांचा मिळत असलेला पाठिंबा हा त्यांच्या सामाजिक कार्याचे ओळख करून देत आहे. त्यामुळे मोनिका नढे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी देऊन त्यांना प्रभागाचा विकास करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण परिसरात प्रचार रॅलीच्या माध्यमातून घरोघरी भेटीगाठी घेत नागरिकांशी संवाद साधला जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोनिका नवनाथ नढे यांना आणि सर्व उमेदवारांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रभाग क्रमांक २२ मध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या तापकीर चौक येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रचार सभेमुळे संपूर्ण प्रभाग राष्ट्रवादीमय: झाल्याचे दिसून येत आहे.या सभेमुळे प्रभागातील संपूर्ण राजकीय वातावरण तापले असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मोनिका नढे यांना प्रभागातून मोठ्या संख्येने त्यांचा विजय होणार असल्याचे म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!